Saturday, 25 July 2020

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा


मानवी जीवन जगताना मनुष्य सतत आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतो.जीवनात प्रत्येकाला सुख आणि दुःख यांच्याशी सामना करावा लागते.यामध्ये प्रत्येकाला सुख हवे असते.सुखाच्या शोधात माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो.मानवाच्या चांगल्या-वाईट कर्तुत्वा नुसार त्याला त्याचे फळ मिळत असते.जीवनात चांगले कर्तुत्व केले.तर जीवन आनंदीमय वाटते.चांगल्या कामाची फळ चांगलीच असतात.वाईट कर्तव्य केले,तर मात्र दुःख भोगावे लागते.दुःख वेदनादायी असते. सलणाऱ्या काट्याप्रमाणे ते सतत जीवनात सलत राहते.त्याचा त्रास माणसला होतो. आयुष्य जगतांना प्रत्येकाने प्रामाणिकपणे, निस्वार्थी, कर्तव्य करत राहिले पाहिजे.जीवनात सुखाची, आनंदाची अनुभूती घ्यायची असेल.तर आध्यात्मिक संस्काराचा मार्ग निवडला पाहिजे. जीवनात अध्यात्मामुळे मनुष्य भगवंताचे नामस्मरण करतो. स्वतःच्या रोजच्या कामात वेळ मिळेल तसे देवाचे नामस्मरण करत राहतो.त्यामुळे साहजिकच चांगली कर्तव्य व देवाचे नामस्मरण यातुन आनंद हा आपल्या घरात खेळत राहतो प्रत्येकाच्या हाताला मिळेल ते काम प्रामाणिकपणे केले.जीवनात सदैव दुसऱ्याची चांगले हित चिंतले तर निश्चितच चांगले होते.जीवनात प्रामाणिकपणा जपला पाहिजे.निस्वार्थी,निरर्व्यसनी जीवन निश्चितच आनंददायी भरलेली असते. वाईट गोष्टी हातून घडत राहिल्या, वाईट चिंतन करत राहिले.वाईट कर्तव्य करत राहिले.तर निश्चितच वाईट होत राहते. अशामुळे आनंद हा एखाद्या झऱ्याप्रमाणे आटुन जातो. जीवन जगताना अशी जगले पाहिजे.स्वतःचा आदर्श समाजापुढे निर्माण झाला पाहिजे.आयुष्यातील आनंद हा आपल्या पुरता मर्यादित न राहता.तो सर्वांन पर्यंत पोहोचला पाहिजे. संत-महात्मे,समाजसुधारक यांनी त्यांच्या चांगल्या कर्तुत्वाने त्यांच्या जीवनातील आनंद चंदनाप्रमाणे सगळीकडे दरवळत ठेवला.आज आपण त्यांना देवाप्रमाणे मानतो.तो त्यांच्या कर्तव्यरुपी आनंदाने होय. आपणही संत-महात्मे,समाज सुधारक यांच्या विचारांचा ठसा आपल्या जीवनात उमटवला पाहिजे. चांगल्या विचारांनी चांगली माणसं घडतात. चांगली पुस्तके चांगली मस्तके तयार करतात. जीवनात चांगली पुस्तके वाचून जीवन चांगले घडवूया.आपल्या जीवनाचा आनंद सुगंधा सारखा सगळीकडे दरवळत ठेवूया. 

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...